मोठा निर्णय; राज्यभरातील 55 वर्षांच्या वरील पोलीसानासाठी वर्क फ्रॉम होम ची घोषणा;गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
आघाडी सरकारने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोठा निर्णय; राज्यभरातील 55 वर्षांच्या वरील पोलीसानासाठी वर्क फ्रॉम होम ची घोषणा;गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
आघाडी सरकारने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई :प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाविकास आघाडी सरकारने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोनाचा जास्त धोका आहे, तेथील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पोलीस कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार आहेत.
राज्यातील सर्व वयवर्षे 55 आणि त्याहून अधिक वय असलेल्या पोलिसांना आता पुढील काळात वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याची संधी मिळणार आहे, असे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (work from home) करता येणार आहे. तसा आदेश देण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात मुंबईत मोठी घोषणा केली आहे. कोरोना काळात पोलिसांची महत्वाची भूमिका राहिली आहे. आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पोलिसांनाही धोका पोहोचू शकतो. याआधी पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांना 24 तास रात्रंदिवस कामावर रुजू व्हावे लागत आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतही गेल्या 24 तासांमध्ये 71 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने 55 वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा आदेश लागू केला आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.