मुंबई

मोठी घडामोड;ओबीसी राजकीय आरक्षण विधेयकाला राज्यपालाची मंजुरी,स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा

हिवाळी अधिवेशनात सदस्यांनी एकमताने मंजूर

मोठी घडामोड;ओबीसी राजकीय आरक्षण विधेयकाला राज्यपालाची मंजुरी, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा

हिवाळी अधिवेशनात सदस्यांनी एकमताने मंजूर

बारामती वार्तापत्र

ज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. तशी माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ हे आता राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.

या विधेयकावर त्यांनी सही केल्यामुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हिवाळी अधिवेशनात सभागृहात सर्व सदस्यांनी एकमताने ओबीसी राजकीय आरक्षण विधेयक मंजूर केले होते. त्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, या विधेयकावर राज्यपाल कोश्यारी यांनी सही केली नव्हती.

आज आघाडी सरकारच्या नेत्यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांनी या विधेयकावर सही केली होती अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच, त्यांनी राज्यपाल यांचे आभार मानत या विधेयकावर सही केल्यामुळे हा विषय संपला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Related Articles

Back to top button