पुणे

मोठी बातमी;पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ,बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

मुख्य प्रवेशद्वारापाशी परिसरात वस्तू सापडल्या आहेत.

मोठी बातमी;पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ,बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

मुख्य प्रवेशद्वारापाशी परिसरात वस्तू सापडल्या आहेत.

पुणे: प्रतिनिधी

पुण्यातील रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने रेल्वे स्टेशन परिसर पोलिसांकडून खाली करण्यात आलं आहे. पुणे रेल्वे स्थानकात तीन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. त्या निकामी करण्याची कारवाई सुरू केली आहे.

ही स्फोटके नक्की कोणत्या स्वरुपाची आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची वर्दी मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेनंतर सुरक्षायंत्रणांनी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. सध्या पुणे रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले आहे. तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबण्यात आल्या आहेत. थोड्याचवेळात बॉम्बशोधक पथक या स्फोटकसदृश वस्तूंची तपासणी करेल. त्यानंतर याबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळू शकेल.

सध्या पुणे रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली जात आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली शोध मोहीम सुरु आहे. बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक याठिकाणी हजर आहे. यावेळी अमिताभ गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सकाळी साडेदहा वाजता रेल्वे स्थानकावर स्फोटकसदृश वस्तू आढळून आल्या. प्रथमदर्शनी तरी या वस्तू जिलेटीन असल्याचे वाटत नाही. पण बॉम्बशोधक पथकाकडून या वस्तूंची तपासणी सुरु आहे. या घटनेनंतर पुणे पोलीस स्थानकाच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

कालच उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर अशाचप्रकारच्या स्फोटकसदृश वस्तू सापडल्या होत्या. या जिलेटिनच्या कांड्या असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. समुद्रकिनाऱ्यावर १० ते १२ स्फोटक कांड्या सापडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. समुद्रकिनारी या कांड्या सापडल्यामुळे माणकेश्वर ग्रामस्थांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण तपास होईपर्यंत नागरिकांनाही काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता पुण्यात अशाच स्फोटकसदृश वस्तू सापडल्याने याचा काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!