मोठी बातमी! अखेर 15 टक्के शुल्क कपात, शालेय फी वाढीसंदर्भात काढले आदेश; शाळांना दिल्या या सूचना
विद्यार्थी संघटना आक्रमक झाली आहे.
मोठी बातमी! अखेर 15 टक्के शुल्क कपात, शालेय फी वाढीसंदर्भात काढले आदेश; शाळांना दिल्या या सूचना
विद्यार्थी संघटना आक्रमक झाली आहे.
मुंबई : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात कपात करण्याबाबत घोषणा केली होती. मात्र काही शाळांनी यावर आक्षेप घेतला होता. म्हणूनच आता शाळांना 15 टक्के फी सवलत देण्याचे आदेश महाराष्ट्र शिक्षण विभागाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोरोना काळातील म्हणजेच वर्ष 2021 मध्ये शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या 15 टक्के फी सवलतीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
आदेश देऊनही शाळांनी त्याचं पालन केलं नव्हतं. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला होता. यावरून आता पुन्हा पत्रक काढून 15 टक्के फी परत करा, नाहीतर पुढच्या वर्षात समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांचा समावेश असलेल्या मुंबईच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना हा आदेश देण्यात आला आहे.
फी वाढीवरुन विद्यार्थी आक्रमक
दरम्यान, पुणे विद्यापीठातील विद्यार्थी फी वाढीवरुन आक्रमक झाले आहेत. तिप्पट फी वाढीमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. ऑनलाईन परीक्षा, तिप्पट फी वाढीला विरोध आहे. तर विद्यार्थी संघटना आक्रमक झाली आहे.