मराठा क्रांती संघर्ष मोर्चा आणि शिवसंग्राम संघटनेच्यावतीने राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा आरक्षणाबाबत निकाल दिला होता.

मराठा क्रांती संघर्ष मोर्चा आणि शिवसंग्राम संघटनेच्यावतीने राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा आरक्षणाबाबत निकाल दिला होता.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
मराठा क्रांती संघर्ष मोर्चा तसेच शिवसंग्राम संघटनेच्यावतीने पुणे जिल्हा यांच्यावतीने, मराठा आरक्षण तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २ सप्टेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसंग्रामचे तुषार काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- मंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा –
सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा आरक्षणाबाबत निकाल दिला होता. त्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांमध्ये आक्रोश निर्माण झाला. एवढे करूनही जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर मग आम्ही करायचे काय? असा प्रश्न मराठा समाजाच्या तरुणांमध्ये निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईत सरकारच्यावतीने कमी पडलेले मंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी धरणे आंदोलनात करणार आहोत. तसेच मागासवर्गीय आयोगातील सदस्य हे मराठा आरक्षणाला विरोध करणारे आहेत. त्यामुळे हा आयोग बरखास्त करून नवीन सदस्य निवडण्यात यावे, अशी देखील मागणी यावेळी करण्यात येणार आहे, असे तुषार काकडे यांनी सांगितले आहे.
- राज्यभर करण्यात येणार आंदोलन –