मोठी बातमी: 2008 मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील ३८ जणांना फाशी शिक्षा, ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा
13 वर्षांनी न्यायालयाचा निकाल आला आहे.
मोठी बातमी: 2008 मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील ३८ जणांना फाशी शिक्षा, ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा
13 वर्षांनी न्यायालयाचा निकाल आला आहे.
प्रतिनिधी
गुजरातसह संपूर्ण देश हादरवून सोडणार्या 2008 मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट (Ahmedabad Bomb Blast) प्रकरणाचा 13 वर्षांनंतर निकाल लागला आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने 49 पैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अहमदाबादमधील विविध ठिकाणी 6 जुलै 2008 साली बॉम्बस्फोट करण्यात आले. यामध्ये 56 लोकांना आपला जीव गमवावा लागला तर, 246 जण गंभीर जखमी झाले होते. अहमदाबादमध्ये 20 ठिकाणी झालेल्या 21 बॉम्बस्फोटांप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालय त्यांना नेमकी कोणती शिक्षा सुनावतेय, याकडे गुजरातसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
अहमदाबादच्या विविध भागांमध्ये २००८ ला बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. विशेष न्यायाधीश ए. आर. पटेल यांच्या कोर्टाने १८ फेब्रुवारी ही निकालाची तारीख निश्चित केली होती. या प्रकरणी कोर्टाने आज निकाल दिला. २६ जुलै २००८ ला अहमदाबाद बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी हादरले होते.
बॉम्बस्फोटांत ५६ जणांचा मृत्यू
अहमदाबादच्या बॉम्बस्फोटांमध्ये ७० मिनिटांत ५६ जणांचा मृत्यू झाला होता. या बॉम्बस्फोटांमध्ये २०० हून अधिक जण जखमी झाले होते. १३ वर्षांहून अधिक काळ कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. गेल्या आठवड्यात विशेष कोर्टाने ४९ जणांना दोषी ठरवले होते, तर २८ जणांची निर्दोष मुक्तता केली होती.
७७ आरोपींविरोधात खटला
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ७७ आरोपींविरुद्ध खटल्याची कार्यवाही पूर्ण केली होती. खटला सुरू असलेल्या ७८ आरोपींपैकी एक सरकारी साक्षीदार ठरला होता. हे आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा पोलिसांचा दावा आहे. २००२ च्या गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला होता, असा आरोप करण्यात आला होता.