वरकुटे बुद्रुक ते अगोती नं.(1)रोड दुरुस्तीच्या कामावर दोन्ही गावचे ग्रामस्थ नाराज
आज पुर्ण झालेल्यारोडचे काम दुसर्याच दिवशी उचकटले जात असुन या कामाचा काही एक उपयोग नाही

वरकुटे बुद्रुक ते अगोती नं.(1)रोड दुरुस्तीच्या कामावर दोन्ही गावचे ग्रामस्थ नाराज
आज पुर्ण झालेल्यारोडचे काम दुसर्याच दिवशी उचकटले जात असुन या कामाचा काही एक उपयोग नाही
इंदापूर;बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील वरकुटे पाटी ते अगोती नंबर 1 या गावातील ग्रामस्थांच्या पंचवीस वर्षांपासून च्या मागनिनंतर कामास मंजुरी मिळाल्यानंतर कामास प्रारंभ परंतु ग्रामस्थ मात्र नाराज पी डब्ल्यू डी च्या माध्यमातून दत्तकृपा कंस्ट्रक्शन याच्याकडे हे काम दिले आसुन कामास सुरुवात झाली ग्रामस्थ ही आनंदाने पंचवीस वर्षांपासून मागनि करत आलेल्या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली म्हणून खुष झाले परंतू दत्तकृपा कंस्ट्रक्शन (दराडे) यांच्या या कामावर गावकरी आता नाराज आहेत
कामावर कुठेही कसलेही सुचना फलक नसुन कामाचा दर्जाही व्यवस्थित नसुन आज पुर्ण झालेल्यारोडचे काम दुसर्याच दिवशी उचकटले जात असुन या कामाचा काही एक उपयोग नाही व पावसाळ्यापर्यंत या रोडवरती पडलेल्या खड्यात वृक्षारोपण करण्याचीच वेळ येऊ नये आसे ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहे शासकीय नियमानुसार कामाच्या सुरुवातीलाच ” सावधान रोड दुरुस्तीचे काम चालु आहे ” आसा बोर्ड लावलेला आसतो परंतु या ठिकाणी मात्र कसलाही बोर्ड नसुन नविन वाहन चालक बोर्ड नसल्या मुळे सरळ जातात व समोरून एखादी गाडी आली तर मात्र दोन्ही गाड्यांना काहीही करता येत नसुन ड्रायव्हरला मात्र तारेवरची कसरत करावी लागते तर बोअरवेल ची गाडी रोड खाली गेल्यानंतर ती गाडी रोडवरती घ्यायला सुमारे चार तासांच्या परिश्रमानंतर गाडी रोडवरती आली बाकी इतर लहान गाड्या मात्र आर्धा आर्धा तास समोर आडवी असलेली गाडी केंव्हा निघेल याची वाट पहात उभ्या आसतात तर टुव्हिलर गाड्यांचे मात्र खुप नुकसान होत आहे रात्री अंधारातून या रोडवरून गाडी चालवणे म्हनजे मुठीत जिव धरूनच गाडी चालवावी लागते रोडवरील खडीवरून गाड्या घसरून पडल्याने नागरीक जखमी होत आहेत व गाड्यांचे नुकसान ही होत आहे कामावर सुरुवातीलाच जर बोर्ड लावलेला आसेल तर ड्रायव्हर पर्यायी रस्ता शोधतील किंवा सावकाश तरी चालतील परंतु कसलाही बोर्ड सुचना फलक नसल्याने वाहन चालक भरधाव चालवत आसतात परंतु आचानक खडे व रोडवरती खडी टाकलेली आसल्या मुळे रोड खाली गाडी घालावी लागते सुदैवाने आनखीन कुठलीही जिवित हाणी झाली नाही परंतु जर काही अनुचित प्रकार घडला एखाद्या व्यक्ती ला आपला जिव गमवावा लागला तर याला जबाबदार कोण? पि डब्ल्यू डी घेणार कि दत्तकृपा कंस्ट्रक्शन आसा सवाल नागरीक उपस्थित करत आहेत