मोहोळचे विद्यमान आमदार यांच्यासह पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यास कोरोनाची लागण.
इंदापूर तालुक्यात नव्याने 14 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर.
मोहोळचे विद्यमान आमदार यांच्यासह पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यास कोरोनाची लागण.
इंदापूर तालुक्यात नव्याने 14 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर.
इंदापूर:-प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील शेळगावचे सुपूत्र मोहोळचे आमदार यांच्यासह त्यांच्या पत्नी व सोळा वर्षीय मुलीसही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आमदार यांचे स्वीय सहाय्यक यांनाही कोरोनाची लागण झाली असून आमदार यांच्यावर सध्या पुण्यात खासगी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.आपली प्रकृती उत्तम असून सर्वांनी आपापली काळजी घ्यावी असा सल्ला आमदारांनी दिला आहे.
तसेच इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीला ही कोरोनाची लागण झाली आहे.
आज इंदापूर तालुक्यातील एकूण रुग्ण संख्येत नव्या 14 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली असून यामध्ये जाचकवस्ती येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांसह भवानीनगर येथील एकास,कुरवली येथील एका 32 वर्षीय पुरुष,भिगवण येथील एका 46 वर्षीय पुरुष,पडस्थळ येथील 65 वर्षीय पुरुष,व पिंपरी बुद्रुक येथील 65 वर्षीय पुरुषास लागणं झाली असून तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.