कीर्तन सुरु असतानाच कीर्तनकार ताजुद्दीन शेख महाराज यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

क्रांतीकारी कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते.

कीर्तन सुरु असतानाच कीर्तनकार ताजुद्दीन शेख महाराज यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

क्रांतीकारी कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते.

धुळे/औरंगाबाद : -बारामती वार्तापत्र

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीने आपले संपूर्ण आयुष्य जगणारे वारकरी संप्रदायातील मात्र धर्माने मुस्लिम असलेले ताजुद्दीन शेख औरंगाबाद यांचे काल (सोमवारी) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर जवळील जामदा येथे किर्तन सुरु असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी जालना जिल्ह्याच्या घनसांगवी तालुक्यातील बोधलापुरी गावातील त्यांच्या आश्रमात साई मंदिराच्या समोर त्यांचा दफनविधी करण्यात आला.

कोण होते ताजुद्दीन महाराज? 
वारकरी सांप्रदाय हा वेदप्रणीत आहे. गीता कुराण या हिंदू आणि मुस्लीम धर्मातील पवित्र ग्रंथांमधून एकम सत्य अर्थात ईश्वरी तत्त्व एकच असल्याचा संदेश देण्यात आल्याचे अभ्यासाअंती पटल्यानंतर ताजुद्दीन नूर महंमद उर्फ सच्चिदानंदगिरी महाराजांना मानवता हाच खरा धर्म आणि सर्व जातीधमांना सामावून घेणारा वारकरी सांप्रदाय जवळचा वाटला. त्यातूनच त्यांनी आपला भाव पांडुरंगी दृढ करून कीर्तनसेवेतून प्रबोधनाचे कार्य अविरत सुरू ठेवले होते. राज्यासह देशाच्या विविध प्रोतांमधून ताजुद्दीन महाराज हे कीर्तन-प्रवचनासाठी वलयांकित नाव झाले होत.

नाथ षष्ठीला पैठणची आणि आषाढीला पंढरपूरची वारी हा महाराजांच्या जीवनाचा अविभाज्य भाग  असं ते नेहमी सांगत . पांडुरंगाच्या ओढीनेच महाराजांचा संत वचनांसह गीता कुराणाचाही गाढा अभ्यास असून त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी वारकरी गर्दी करतानाही पहायला मिळाययचे. हिंदू- मुस्लीम धर्मामधील द्वेषाची दरी ही केवळ परस्परांची भाषा येत नसल्यामुळे अधिकच रुंदावल्याचे महाराज नेहमी सांगत. मुस्लीमांना संस्कृत आणि हिंदूंना उर्दू-अरबी भाषा अवगत झाल्यानंतर गीतेतील श्लोक आणि कुराणांमधील हदीस, आयते यांचा अर्थबोध होईल आणि एकमेकांविषयी तयार झालेली द्वेषाची जळमटे गळून पडतील, असा विश्वास महाराजांना वाटायचा.

जन्माने मुस्लीम असले तरी वारकरी प्रदायाची जीवनशैली अंगीकारलेले ताजुद्दीन महाराज नित्य हरिपाठ, भजन कीर्तन आणि वारीलाही जाण्याच्या परंपरेचेकसोशीने पालन करत . मूळचे घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थजवळील बोधलापुरी हे त्यांचे गाव .गावासह पैठणमध्येही त्यांनी एक आश्रम काढून त्यातून वारकरी सांप्रदायाचा प्रसार प्रचाराचे काम केले जाते. सर्वच संतांच्या अभंग गांचा त्यांचा अभ्यास आहे. महाराज लहानपणापासूनच सांगत, वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाले. हरिपाठ म्हणणे, भजन-कीर्तन ऐकणे यात मनाचा ओडा पाहून कुटुंबीयांचा विरोध पत्करून एके दिवशी आलंदी गाठली. तेथून हृषीकेशला पोहोचलो, त्र्यंबकेशरला गेले. तेथे अनुग्रहित होऊन वारकरी सांप्रदायाच्या अभ्यासासाठी ज्ञान ग्रहण केले. मूळचा मुस्लीम असल्याने कुराणाचाही अभ्यास केला. गीतेचाही अभ्यास घडल्याने देन्ही धर्मातील पवित्र ग्रंथात मानवतेच्या कल्याणाचे संदेश असल्याचे आपल्या कीर्तनातून सांगत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!