स्थानिक

म्हणून सव्वा महिन्याच्या त्या मुलीचा केला खून

धक्कादायक घटना २५ नोव्हेंबर रोजी घडली

म्हणून सव्वा महिन्याच्या त्या मुलीचा केला खून

धक्कादायक घटना २५ नोव्हेंबर रोजी घडली

बारामती वार्तापत्र 

तिसरी मुलगी झाल्याने जन्मदात्या आईने माळेगाव येथील आपल्या सव्वा महिन्याच्या मुलीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.माळेगाव येथील पोलिसांनी  खुनी आईवर गुन्हा दाखल केला आहे. दिपाली संदिप झगडे(रा.काटेवाडी ता.बारामती) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

अशी आहे घटना…..

बारामती तालुक्यात नुकत्याच जन्म झालेल्या सव्वा महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीत टाकून देऊन तिचा संशयास्पद खून झाल्याची धक्कादायक घटना २५ नोव्हेंबर रोजी घडली होती. सदर घटना बारामती तालुक्यातील माळेगाव येथील चंदन नगर येथे घडली होती. आपले स्वतःचे सव्वा महिन्याचे बाळ घरातून गायब झाल्याचे लक्षात येताच. बाळाची आई दिपाली संदीप झगडे यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत मिसिंग ची तक्रार दिली. मात्र तक्रारीनंतर काही वेळातच फिर्यादीच्या वडिलांना आपली नात घरासमोरील पाण्याच्या टाकीत मृतवस्थेत आढळून आली.सदरची घटना समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी घटनास्थळी भेट दिली. आणि तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.व तपासाअंती आईनेच आपल्या जन्मदात्या मुलीचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

Related Articles

Back to top button