म.ए. सो. हायस्कूलमध्ये अभाविप चा जिल्हा अभ्यास वर्ग संपन्न
दौंड, इंदापूर, पुरंदर, सासवड व बारामती कार्यकर्ते सहभागी झाले होते
म.ए. सो. हायस्कूलमध्ये अभाविप चा जिल्हा अभ्यास वर्ग संपन्न
दौंड, इंदापूर, पुरंदर, सासवड व बारामती कार्यकर्ते सहभागी झाले होते
बारामती वार्तापत्र
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे च्या वतीने आयोजित करण्यात आलेला बारामती जिल्हा अभ्यास वर्ग बारामती येथील म.ए.सो हायस्कूल येथे नुकताच संपन्न झाला.
या जिल्हा अभ्यास वर्गामध्ये दौंड, इंदापूर, पुरंदर, सासवड व बारामती तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पियाजो कंपनीचे व्यवस्थापक किरण जोशी यांच्यासह अभाविप चे पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत, जिल्हा संयोजक समीर मारकड, जिल्हा अभ्यासवर्ग प्रमुख अजय चव्हाण, यांच्या उपस्थितीत हा जिल्हा अभ्यास वर्ग पार पडला.
या अभ्यास वर्गात सैद्धांतिक भूमिका या विषयावर पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत यांनी मार्गदर्शन केले.
तर कार्यकर्ता व्यवहार यावर शुभम अग्रवाल व स्मृतीताई इंगळे यांनी मार्गदर्शन केले. सोशल मीडिया या विषयावर विक्रम शिंदे तसेच आंदोलन या विषयावर जिल्हा संयोजक समीर मारकड, व अभाविप कार्यपद्धती पूर्व कार्यकर्ते या विषयावर अमित देवकाते व सौरभ शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक समीर मार्कड यांनी केले तर समारोप पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत यांनी केला. यावेळी अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.