क्राईम रिपोर्ट

यवत पोलिस स्टेशन हद्दीत डीझेल चोरांचा धुमाकूळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून टोळी जेरबंद

या कारवाईत एकूण ४ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याप्रकरणी 6 आरोपींना सापळा रचून पकडण्यात आले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

यवत पोलिस स्टेशन हद्दीत डीझेल चोरांचा धुमाकूळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून टोळी जेरबंद

या कारवाईत एकूण ४ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याप्रकरणी 6 आरोपींना सापळा रचून पकडण्यात आले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

क्राईम ; बारामती वार्तापत्र

दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिझेल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या कारवाईत एकूण ४ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 6 आरोपी पुढील तपासासाठी यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

डिझेल चोरीच्या 2 घटना

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ जून २०२१ रोजी मध्यरात्री नांदूर येथील एका कंपनीसमोर पार्किंग मधिल ५ ट्रकमधून सुमारे ८३ हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेल्याची घटना घडली होती. तसेच ११ जून २०२१ रोजी पारगाव येथील एका ट्रकमधून २५ हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेले होते. या दोन्ही डिझेल चोरीच्या घटनाबाबत गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली.

सापळा रचून 6 जणांना पकडले

त्यानुसार, या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका विशिष्ट पथकाने तपास सुरू केला. या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत उरुळी कांचन परिसरातील काही संशयितांची नावे मिळाली. या माहितीची खात्री करून उरुळी कांचन परिसरातील दत्तवाडी या ठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि 6 जणांना ताब्यात घेतले. दत्ता विनोद रणधीर (२२ वर्षे), राहुल उर्फ दगड्या मारुती मदने (२७ वर्षे), वैभव राजाराम तरंगे (१९ वर्षे), प्रतीक बन्सीलाल तांबे (२६ वर्षे), स्वरूप विजय रायकर (२३ वर्षे) आणि धर्मेंद्र कुंडलिक टिळेकर (३४ वर्षे) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

चोरीची दिली कबुली

हे आरोपी मारुती सुझुकी कंपनीची एक अल्टो कार, इर्टीगा कार घेऊन रात्री बाहेर पडून डिझेल चोरी करत होते. त्यांनी डिझेल चोरी केल्याचे कबुलही केले आहे. यादरम्यान, त्यांनी एक सॅमसंग कंपनीचा मोबाइलदेखील चोरल्याचे सांगितले आहे.

४ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त

या आरोपींकडून ८० हजार रुपयांची अल्टो, 4 लाख रुपयांची इर्टीगा, 10 हजार रुपयांचा चोरलेला सॅमसंग j2 मोबाइल, असा जवळपास एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर आरोपी कडून
१) मारुती सुजूकी कंपनीची अल्टो कार किंमत रु: ८०,०००
२) मारुती सुजूकी कंपनीची इर्तीगा कार किंमत रु : ४ लाख
३) गुन्ह्यातील चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा j2 मोबाईल किंमत रु १०,०००
असा एकूण ४,९०,००० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून , आरोपी आणि सदरचा मुद्देमाल पुढील तपास कामी यवत पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहेत.
सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख सो अप्पर पोलिस अधिक्षक श्री मिलिंद मोहिते ,उपविभागीय पोलिस अधिकारी दौड विभाग श्री राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे,पो ना विजय कांचन,पो ना राजु मोमिन,पो ना अभिजित एकशिंगे,पो कॉ अमोल शेडगे,पो कॉ मंगेश भगत,पो कॉ धिरज जाधव,म पो कॉ पूनम गुंड,पो कॉ दगडू विरकर यांचे पथकाने केली आहे .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!