….ते कंटाळतील पण मी नाही,अगोदर रात्री येत होतो आत्ता दिवसा येणार – श्रीकांत पाटील
शहा येथे बोलताना वाळूमाफियांना दिला सूचक इशारा

….ते कंटाळतील पण मी नाही,अगोदर रात्री येत होतो आत्ता दिवसा येणार – श्रीकांत पाटील
शहा येथे बोलताना वाळूमाफियांना दिला सूचक इशारा
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे शहा येथील श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवार निमित्ताने शंभू महादेव मंदिरात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी वाळूमाफियांना सूचक इशारा देताना वरील वक्तव्य केले.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, शहा गावाने यापूर्वी मला कधी बोलावले नव्हत आणि वाटलं देखील नाही परंतु बोलावल्या बद्दल आभारी आहे.मला नेहमी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेईला आवडते.अनेकांनी माझी प्रतिमा ही खूप कडक आहे म्हणून बनवली आहे परंतु अस काही नाही.अनेक गैरसमज आहेत. लोकांना न्याय मिळावा म्हणून मी सतत धडपडतो, नोकरी करत असताना एकाचा फायदा न बघता अनेकांचा फायदा बघतो. मागील आठवड्यात सर्वांना बोलावून घेत चर्चा देखील केली.माणूस जन्मतःवाईट नसतो काही कारणाने चुकीच्या मार्गाने जातो त्यामुळे त्यांनी चूक सुधारली पाहिजे.
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात नव्या पिढीला चांगले संस्कार द्या, आपल्या परिवारासह गावाच्या भल्यासाठी शिक्षणासह अध्यात्माची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने लहानपणापासूनच चांगल्या सवयी जोपासल्या पाहिजेत असे ही यावेळी पाटील यांनी नमूद केले.यावेळी पाटील यांच्या हस्ते मंदिर परिसरात बेलाच्या झाडाचे वृक्ष रोपण करण्यात आले.त्याच बरोबर चित्रकला निबंध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानपत्र देण्यात आले.