यशदातीलअधिकारी डॉ. बबन जोगदंड यांना राज्यपालांच्या हस्ते शिक्षण व पर्यावरण मित्र पुरस्कार

यशदाच्या यशमंथन या मासिकाचे ते संपादक आहेत.

यशदातीलअधिकारी डॉ. बबन जोगदंड यांना राज्यपालांच्या हस्ते शिक्षण व पर्यावरण मित्र पुरस्कार

यशदाच्या यशमंथन या मासिकाचे ते संपादक आहेत.

पुणे,बारामती वार्तापत्र रिपोर्ट

यशदा पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या शैक्षणिक व पर्यावरणविषयक योगदानाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण व पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन राजभवनमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाच्या औचित्याने राजभवन मुंबई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्थेचे प्रमुख व प्रसिद्ध समाजसेवक चंद्रकांत शहासने यांनी लिहिलेल्या पर्यावरण विचार या पुस्तिकेचे विमोचन राज्यपालांच्या हस्ते झाले.

याच कार्यक्रमात शिक्षण व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील काही मान्यवरांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले .यामध्ये डॉ. बबन जोगदंड यांचा समावेश होता.

डॉ.जोगदंड यांनी शैक्षणिक, सामाजिक,प्रशासकीय, पर्यावरण विषयक क्षेत्रात भरीव काम केले आहे.या कामाची दखल घेऊन त्यांना ‘राष्ट्रीय पर्यावरण व शिक्षण मित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

डॉ. जोगदंड यांनी शैक्षणिक कार्यातही मोठे योगदान दिले असून त्यांनी अनेकांना शैक्षणिक,स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर पर्यावरण विषयक जनजागृतीसाठीही त्यांनी काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत पंधरा विषयात पदव्या संपादन केल्या असून जवळपास आठ विषयांमध्ये प्रमाणपत्र, डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. यशदाच्या यशमंथन या मासिकाचे ते संपादक आहेत. या माध्यमातूनही त्यांनी पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक संस्थांचे १५ हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत.

त्यांना हा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनदंन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!