यशस्वी होण्यासाठी विचार व संगत यांची सांगड महत्त्वाची-श्री सचिन लोखंडे
स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी समर्पण आणि कठोर परिश्रम गरजेचे

यशस्वी होण्यासाठी विचार व संगत यांची सांगड महत्त्वाची-श्री सचिन लोखंडे
स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी समर्पण आणि कठोर परिश्रम गरजेचे
बारामती वार्तापत्र
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन माळेगाव (बु.) या महाविद्यालयातील संगणक विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी युवक दिनानिमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक माळेगाव मा. श्री सचिन लोखंडे यांचे “युवक: काल आज आणि उद्या” या विषयावर वर मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना त्यांनी कर्तव्य जबाबदारी व समाजसेवा याचा खरा अर्थ आजच्या युवा पिढीला समजला तर त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडेल अशी आशा व्यक्त केली. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी समर्पण आणि कठोर परिश्रम गरजेचे आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे सर यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रा. सचिन सस्ते, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ.मंगेश फुटाणे ,प्रा. सचिन तावरे प्रा.किशोर सुतार प्रा. अनुराधा चव्हाण प्रा. शितल जगदाळे प्रा. पुनम वाघ , रोहन तावरे आणि माजी विद्यार्थी प्रणव तावरे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. संतोषी पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. आकांक्षा सोनावणे हिने केले.
सदरचा कार्यक्रम आयोजित करण्याकरिता शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री. केशवबापू जगताप तसेच संस्थेचे विश्वस्त मा.श्री वसंतराव तावरे , श्री रवींद्र थोरात,श्री.अनिल जगताप, श्री. महेंद्र तावरे , श्री रामदास आटोळे, श्री. गणपत देवकाते, सौ.सीमा जाधव , सौ.चैत्राली गावडे ,संस्थेचे सचिव मा.डॉ.धनंजय ठोंबरे यांचे सहकार्य लाभले.