यावर्षी “फटाकेमुक्त” दिवाळीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मागणी करणार, आरोग्यमंत्री टोपे म्हणाले
करोना रुग्णांसाठी ती बाब अधिक धोक्याची आहे.
यावर्षी “फटाकेमुक्त” दिवाळीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मागणी करणार, आरोग्यमंत्री टोपे म्हणाले
करोना रुग्णांसाठी ती बाब अधिक धोक्याची आहे.
मुंबई :बारामती वार्तापत्र
करोनाचा प्रादुर्भाव तसेच कोरोना बाधित रुग्णांना धुरामुळे होऊ शकणारा संभाव्य त्रास लक्षात घेऊन यंदा महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
फटाकेमुक्त दिवाळी . साजरी करण्याबाबत आतापासूनच आपल्या मनाची तयारी करा.
फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो. करोना रुग्णांसाठी ती बाब अधिक धोक्याची आहे.
त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी केली गेली पाहिजे. महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मी स्वत: मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार आहे, असे राजेश टोपे यांनी पुढे नमूद केले. दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगण्याची गरज आहे. विशेष करून गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळावे, मास्कचा वापर करावा, हात सतत धुत रहावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.