या काळात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडून दरवर्षी अंदाजे दीड कोटी रुपये मिळाल्याचा आरोप, सुरक्षा रक्षक पोलीस आयुक्तांकडून बदली?
चित्रपटांच्या शूटिंगपासून केबीसीच्या सेटपर्यंत अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी जितेंद्र शिंदे जातीने हजर असायचा.

या काळात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडून दरवर्षी अंदाजे दीड कोटी रुपये मिळाल्याचा आरोप, सुरक्षा रक्षक पोलीस आयुक्तांकडून बदली?
चित्रपटांच्या शूटिंगपासून केबीसीच्या सेटपर्यंत अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी जितेंद्र शिंदे जातीने हजर असायचा.
क्राईम;बारामती वार्तापत्र
बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे 2015 पासून कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाची बदली करण्यात आली आहे. जितेंद्र शिंदेची डीबी मार्ग पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. शिंदेला अमिताभ बच्चन यांच्याकडून अंदाजे दीड कोटी रुपये वार्षिक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
अमिताभ बच्चन यांना एक्स दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून प्रदान करण्यात आली होती. मुंबई पोलिसांचे दोन कॉन्स्टेबल सतत अमिताभ यांच्यासोबत असतात. शिंदे हे त्यापैकी एक आहेत. शिंदे हे 2015 पासून अमिताभ यांच्या सुरक्षेत होते. अमिताभ घरातून बाहेर पडल्यापासून ते सेट, फिल्म शूटिंगपर्यंत ते अमिताभ यांच्यासोबत सावलीप्रमाणे असायचे. जगभरात अमिताभ यांचे चाहते आहेत. जेव्हा अमिताभ बाहेर पडतात. तेव्हा चाहते त्यांच्या भोवती गरडा घालतात. यावेळी जितेंद्र यांच्यावर अमिताभ यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते.
अमिताभ बच्चन यांचा जितेंद्र शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. शिंदे हे सावलीसारखे अमिताभ यांच्यासोबत असायचे. जितेंद्र शिंदे यांना अमिताभ यांच्याकडून वर्षाला दीड कोटी रुपये मिळत होते. म्हणजे महिन्याला त्यांची कमाई 12 लाखांच्याही वर होती, अशी चर्चा सुरू आहे. तसेच जितेंद्र शिंदेची स्वत:ची सुरक्षा एजन्सी असून ती पत्नीच्या नावे असल्याची चर्चा आहे. अभिनेता आणि निर्माता एलीजाह वूड भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा जितेंद्र यांनी त्याला सुरक्षा पुरलवी होती, असेही म्हटलं जात आहे. जर अमिताभ बच्चन शिंदे यांना महिन्याला पगार देत असतील. तर सरकारी कर्मचारी दोन ठिकाणांवरून पगार घेऊ शकत नाही. हे नियमांच्या बाहेर आहे. यामुळे शिंदे यांच्या संपत्तीची पोलीस विभागाकडून चौकशी होणार असल्याची माहिती आहे.