राजकीय

या निवडणुकीत सर्वाधिक मते कोणत्या उमेदवाराला? बारामती कितव्या क्रमांकावर? वाचा टॉप १० आमदारांची यादी

या निवडणुकीत महायुतीने महाविकास घाडीचा सुपडा साफ

या निवडणुकीत सर्वाधिक मते कोणत्या उमेदवाराला? बारामती कितव्या क्रमांकावर? वाचा टॉप १० आमदारांची यादी

या निवडणुकीत महायुतीने महाविकास घाडीचा सुपडा साफ

बारामती वार्तापत्र 

राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी लागले. या निवडणुकीत महायुतीने महाविकास घाडीचा सुपडा साफ केला. तब्ब. २३६ मतदार संघात महायुतीचे आमदार मोठ्या मतांनी निवडून आले.

यात भाजपने तब्बल १३७ जागांवर यश मिळवलं आहे. भाजपच्या अनेक उमेदवारांनी मोठं मताधिक्य मिळवलं आहे. या पूर्वी अजित पवार हे सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या आमदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असायचे. मात्र, यावेळी त्यांना हा रेकॉर्ड कायम ठेवता आला नाही.

महायुतीचे अनेक उमेदवार लाखापेक्षा जास्त मते घेऊन निवडून आले आहेत. यात साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल १ लाख २४२ हजारांचे मताधिक्य घेऊन अजित पावर यांचा सर्वाधिक मतांचा रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे. तर त्यानंतर धनंजय मुंडे यांना राज्यात सर्वाधिक मते मिळाली आहे. त्यांना १.४१ लाख मते मिळाली आहे.

सर्वाधिक मते मिळवणाऱ्या आमदारांची यादी

१ शिवेंद्रराजे भोसले (भाजप, सातारा मतदारसंघ): ०१ लाख ४२ हजार १२४ मते

२. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी, परळी मतदारसंघ) ०१ लाख ४१ हजार २४१ मते

३. दिलीप बोरसे (भाजप, बागलाण मतदारसंघ) १ लाख २९ हजार २९७ मते

४. एकनाथ शिंदे (शिवसेना, कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ) १ लाख २० हजार ३३५ मते

५. चंद्रकांत पाटील (भाजप, कोथरुड मतदारसंघ) १ लाख १२ हजार ४१ मते.

६. प्रताप सरनाईक (शिवसेना, ओवळा माजीवड मतदारसंघ) – १ लाख ९ हजार मते

७. सुनील शेळके (राष्ट्रवादी, मावळ मतदारसंघ) ०१ लाख ८ हजार ५६५ मते.

८. शंकर जगताप (भाजप, चिंचवड मतदारसंघ) ०१ लाख ३ हजार ८६५ मते

९. अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस, बारामती मतदारसंघ) १ लाख ८९९ मते.

१०. दादा भुसे, (शिवसेना शिंदे गट,मालेगाव बाह्य) १ लाख २ हजार ४४० मते.

तर मुब्रा कळवा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे ९६ हजार २२८ मतांनी निवडून आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!