युगेंद्र पवारांच्या बारामतीतील पराभवाबद्दल बोलताना अजितदादा गहिवरले, म्हणाले..
ताईचे काम केले म्हणून लगेच त्याला उमेदवारी दिली

युगेंद्र पवारांच्या बारामतीतील पराभवाबद्दल बोलताना अजितदादा गहिवरले, म्हणाले..
ताईचे काम केले म्हणून लगेच त्याला उमेदवारी दिली
बारामती वार्तापत्र
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री व महायुतीचे उमेदवार अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आणि पुतणे युगेंद्र पवार यांच्यावर मोठ्या फरकाने मात केली.
अजित पवार यांनी बारामती जिंकल्याने थेट शरद पवार यांच्याविरोधातील लढाई त्यांनी जिंकल्याचे आता बोलले जात आहे. युगेंद्रच्या पराभवानंतर पहिल्यांदाच अजित पवार या लढतीवर बोलले आहे. युगेंद्रला माझ्याविरोधात उमेदवारी द्यायला नको होती, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, युगेंद्रला माझ्या विरोधात उमेदवारी नको द्यायला हवी होती. प्रतिभाकाकी माझ्या आईसारख्या आहेत . मला वाईट वाटत होतं की त्या भिंगरी लागल्या सारख्या फिरत होत्या. युगेंद्रेने ताईचे काम केले म्हणून लगेच त्याला उमेदवारी दिली. त्याला शिकू द्यायला हवे होते. काम करू द्यायला हवे होते.
विजयानंतर अजित पवार काय म्हणाले?
निकालानंतर अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेनं प्रचंड मोठ्या मताधिक्याच्या स्वरूपात पुढील पाच वर्षांसाठी आमच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची आणि सर्व समाजघटकाच्या हिताची..!जनतेच्या इच्छा-आकांक्षा, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेच सदैव कार्यतत्पर राहू. कोणाच्या विरोधात टीका-टिपण्णी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आम्ही प्राधान्यानं केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी बोलू आणि जे बोलू तेच कृतीतून करून दाखवू.
विजयाचे श्रेय अजित पवारांनी कोणाला दिले?
अजित पवार म्हणाले, या अद्भुत यशाचं मुख्यत्वे श्रेय माझ्या मतदारराजाला जातं. तसंच या यशात माझ्या भगिनींचा, मायमाऊलींचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. मतदारराजाचा आमच्यावरचा दृढ विश्वास, आमच्या पाठीशी जनशक्तीचा असलेला आशीर्वाद, आमच्या कार्यकर्तृत्वाला जनतेनं दिलेली दाद या माध्यमातून जनतेनं विकासाची कास धरली आहे, हे स्पष्ट होत आहे. माझी बारामती आणि मी बारामतीकरांचा हे या विजयाच्या रूपानं सिद्ध झालं आहे. माझं आणि बारामतीकरांचं हे अतूट नातं हे सदैव राहील. बारामतीसह संपूर्ण राज्य हे विकासाच्या पथावर आणखी गतिमान होणार, यात तिळमात्र शंका नाही.