स्थानिक

युवकांनी रक्तदानाची चळवळ उभारावी -सौ शर्मिला पवार

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त

युवकांनी रक्तदानाची चळवळ उभारावी -सौ शर्मिला पवार

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त

बारामती वार्तापत्र
रक्त हे कोणत्या कारखान्यात तयार करता येत नाही. त्यासाठी रक्तदानच करावे लागते. समाजात ज्यावेळी एखादी आपत्ती ओढवते त्यावेळी खर्‍या अर्थाने रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण होते.ही गरज भागविण्यासाठी शासनाला रक्तदान करा असे सांगावे लागते ही शोकांतिका आहे.

युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदानाची चळवळ समाजात उभी करावी यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. रक्तदान केल्याने कोणताच तोटा होत नसून उलट रक्तदानाचा फायदाच होतो. त्यामुळे युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे व रक्ताची गरज भागवावी असे आवाहन शरयु फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ शर्मिला वहिनी पवार यांनी केले.

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयडीसी येथील अजितदादा युथ फाऊंडेशन व आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शर्मिला वहिनी पवार बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर, युवक तालुकाध्यक्ष राहुल वाबळे , रुई च्या नगरसेविका सुरेखा चौधर, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, रुई चे माजी सरपंच मच्छिंद्र चौधर, बारामती बँकेचे उपाध्यक्ष अविनाश लगड, प्रताप पागळे, अनिल काटे, नानासो थोरात, राहुल घुले, महादेव कचरे, सरदार साळुंके, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आदित्य इंटरनॅशनल स्कूल व अजित दादा युथ फाउंडेशन यांनी सामाजिक बांधिलकीतून सामाजिक भान जपत रक्तदान शिबिर घेऊन फार मोठे कार्य करीत आहे. यावेळी आदित्य इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने निट सीईटी, जेईई ,परीक्षा मध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. अजित दादा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, उपाध्यक्ष दत्ता माने, सचिव ,सचिन घाडगे व पदाधिकारी उपस्थित होते आभार अनील साबळे पाटील यांनी मानले. यावेळी 588 रक्त बॉटल संकलित झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!