
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान :प्रशांत सातव.
३१ दात्यांनी रक्त संकलन केले.
बारामती -वार्तापत्र रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे सर्वांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आव्हानमाजी सह्ययक विक्रीकर आयुक्त प्रशांत सातव यांनी केले.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे राज्यातील दुहेरी धोका निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हातभार लावणार आहे, प्रशांत (नाना) सातव यांनी केले. या शिबिरात ३१ दात्यांनी रक्त संकलन केले.
स्व. माणिकबाई चांदूलाल सराफ रक्तपेडी याठिकाणी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी जयंती तसेच स्व. बबनराव साठे स्मृती दिनानिमित्त शनिवारी (ता. ६) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रशांत (नाना) सातव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या महामानवाच्या स्मृतींना उजाळा देऊन आपण रक्तदान करणार असल्याचे सांगून श्री. सातव म्हणाले, या कोरोनाच्या महामारी संकटात मागच्या वेळीही अशाचप्रकारे ५० दात्यांनी रक्तदान केले होते. आशा संकटप्रसंगी सर्व दात्यांनी रक्तदान करून या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहनही श्री. प्रशांत सातव यांनी केले आहे.