रतीलाल चौधर यांना “कोरोना योद्धा पुरस्कार “.
डॉक्टर डे च्या निमित्ताने सत्कार संपन्न.
बारामती:वार्ताहर
बारामती व इंदापूर तालुक्यात तंटा मुक्ती मध्ये उत्कृष्ट काम करीत सेवा बजावत असताना कोरोना काळात सुद्धा म्हतपूर्ण काम केल्याबद्दल भिगवण पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस उपनिरीक्षक रतीलाल चौधर यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
प्रत्येक वर्षी डॉक्टर डे साजरा केला जातोच परंतु या वर्षी होणारा डॉक्टर डे कोरोनाच्या लढाईत डॉक्टरांनी स्वताचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केल्याने साजरा होणारा डॉक्टर डे खास असल्याचे मत भिगवण रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष संपत बंडगर यांनी व्यक्त केले.
भिगवण येथील दुर्गामाता मंदिरात रोटरी क्लबच्या वतीने डॉक्टर डे साजरा करण्यात आला यावेळी बंडगर बोलत होते.यावेळी भिगवण गावचे सरपंच प्रतिनिधी संतोष धवडे ,सचिन बोगावत ,महेश शेंडगे ,प्रदीप वाकसे ,संजय चौधरी ,कमलेश गांधी ,अमोल खानावरे ,नामदेव कुदळे तसेच इतर रोटरी सदस्य हजर होते.भिगवण परिसरात कोरोनाच्या काळातही कोणत्याही वैदकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर ने आपली सेवा बंद ठेवली नाही .शासनाकडून कोणतीही जीवरक्षक साहित्याचे पुरवठा केला नसतानाही आपले आरोग्य धोक्यात घालून सेवा दिली यासाठी रोटरी क्लब च्या वतीने हा डॉक्टर डे साजरा करण्यात आला.यावेळी भिगवण डॉक्टर असोसिएशनचे गव्हर्नर डॉ.लालचंद शहा,अध्यक्ष संकेत मोरे ,डॉ.चंद्रकांत खानावरे ,पांडुरंग जिरगे ,ज्ञानेश्वर रेनुकर ,अमोल खानावरे ,प्राची थोरात ,जयश्री गांधी ,युवराज गोडसे ,रामाराव हगारे ,अतुल कोठारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांना हि डॉक्टर संघटनेच्या वतीने मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.