रमजान ईदची ईदी कोरोना लढ्यासाठी, बारामतीच्या बागवान कुटुंबातील मुलांची 15 हजारांची मदत मुख्यमंत्री निधीला.. अजित पवार यांनीही दिला मुलांना खाऊचा पुडा भेट..
तब्बल 15 हजार रुपये जमा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द.
रमजान ईदची ईदी कोरोना लढ्यासाठी, बारामतीच्या बागवान कुटुंबातील मुलांची 15 हजारांची मदत मुख्यमंत्री निधीला.. अजित पवार यांनीही दिला मुलांना खाऊचा पुडा भेट..
बारामती : रमजान ईदमध्ये नातेवाईक आणि वडीलधाऱ्यानी दिलेली ईदी जपून ठेवत ती कोरोना लढ्यासाठी देत बारामतीतील बागवान कुटुंबातील चिमुकल्यांनी अनोखा आदर्श निर्माण केलाय..
फिरोज आणि अमजद बागवान या दोघा भावंडांच्या चार चिमुकल्यांनी ईदी म्हणून मिळालेले तब्बल 15 हजार रुपये जमा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केले.
मुलांनी दाखवलेलं सामाजिक भान पाहून अजित पवार यांनीही या मुलांना आपल्या गाडीतून एक खाऊचा पुडा या मुलांना भेट दिला..
बारामतीतील जिशान फिरोज बागवान, मलिका अमजद बागवान, फरहान फिरोज बागवान आणि अमन अमजद बागवान या चिमूकल्यांकडे रमजान ईदनंतर जवळपास 15 हजार रुपये ईदी जमा झाली.
नेहमीप्रमाणे या रकमेतून ही मुले काहीतरी खरेदी करतील या विचारात पालक असतानाच या चिमुकल्यांनी ही रक्कम कोरोना लढ्यासाठी वापरण्याचा मानस व्यक्त केला.
त्यानुसार स्थानिक पत्रकार नविद पठाण यांनी ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातली.. त्यानंतर या मुलांसह फिरोज बागवान, बतुल शेख यांनी या रकमेचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केली.. अजित पवार यांनी या मुलांची आस्थेवाईकपणे चौकशी करत गाडीतून एक खाऊचा पुडा त्यांना भेट दिला.