राऊतवस्ती येथील कोरोनाग्रस्त ज्येष्ठ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
दोन दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू.
राऊतवस्ती येथील कोरोनाग्रस्त ज्येष्ठ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
दोन दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू.
इंदापूर:-प्रतिनिधी
दि.30 जुलै रोजी इंदापूर तालुक्यात एकूण 16 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते. तर काल भिगवण येथील एका व्यक्तीचा इंदापूर या ठिकाणी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. काल पॉझिटिव्ह आलेल्या सोळा रुग्णांपैकी राऊत वस्ती येथील एका महिलेचा देखील समावेश होता. या महिलेवर इंदापूर येथे उपचार सुरू असता आज दि.31 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला असून संपर्कातील चार जणांना क्वारंटाईन केले असल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.
काल व आज दोन दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने इंदापूर तालुक्यातील आतापर्यंत कोरोनाने एकूण मृत्यू झालेल्यां रुग्णांची संख्या 7 वर जाऊन पोहचली आहे तर आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या 181 आहे.