इंदापूर

राजकारणाचे चित्र बदलत;बहुचर्चित छत्रपती कारखान्याची बिनविरोध निवडणुकीचे संकेत

छत्रपतीची निवडणूक बिनविरोध झाल्यास त्या पाठोपाठ होणा-या माळेगाव साखर कारखान्याचीही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

राजकारणाचे चित्र बदलत;बहुचर्चित छत्रपती कारखान्याची बिनविरोध निवडणुकीचे संकेत!

छत्रपतीची निवडणूक बिनविरोध झाल्यास त्या पाठोपाठ होणा-या माळेगाव साखर कारखान्याचीही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

बारामती वार्तापत्र

भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा निवडणुक कार्यक्रम नुकताच जाहिर झाला आहे. येथील शेतकरी कृती समितीचे नेते पृथवीराज जाचक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या निवडणुकीत आव्हान देण्याच्या तयारीत हाेते.त्यातच येथील राजकारणात नवा आणि मोठा ‘व्टीस्टट’ आल्याने बिनविरोध निवडणुकीचे संकेत आहेत.

उपमुख्यमंत्री पवार आणि जाचक यांच्या उपस्थित रविवारी दुपारी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी उपमुख्यमंत्री पवार याबाबत नव्याने घोषणा करणार आहेत.

भवानीनगर येथे दुपारी १ च्या सुमारास पवार यांचे हेलीकाॅप्टरने आगमन होणार आहे.यावेळी पवार जाचक यांच्या उपस`थितीत शेतकरी आणि सभासदांशी संवाद साधणार आहेत. यांचे मनोमिलन होण्याची शक्यता आहे.२००३ मध्ये कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवी गळीत हंगामाच्या काळात डावलले जात असल्यााच्या भावनेतून पृथवीराज जाचक अजित पवार यांच्यापासून दुर झाले होते.त्यानंतर जाचक यांनी भाजपमधून त्यावेळी थेट शरद पवार यांच्या विरोधात निवडणुक लढविली होती.त्यानंतर जाचक हे राष्ट्रवादीपासून अंतर राखुन होते.२०२० मध्ये जाचक यांची ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी चर्चा होवून समेट घडला.२०२० च्या गळीत हंगामापासून छत्रपती कारखान्याच्या महत्वपुर्ण निर्णयात कारभारात जाचक यांनी लक्ष घातले.मात्र,आॅक्टोंबर २०१२१ मध्ये संचालक मंडळ आणि जाचक यांच्यात वाद झाला.या कारखान्यात अजित पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो.त्यामूळे संचालक मंडळाबरोबर मतभेद झाल्यानंतर जाचक पुन्हा उपमुख्यमंत्री पवार म्हणजेच पर्यायाने अजित पवार यांच्यापासून दुर झाले.तसेच लोकसभा,विधानसभा निवडणुकीत देखील जाचक यांनी त्यांच्यापासून अंतर राखणे पसंत केले.

तसेच जाचक यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडुन सत्तेचा गैरवापर सुरु असून सर्वोच्य न्यायालयात सुनावणी सुरु असतानाही छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप केला होता.त्यानंतर तिसर्याच दिवशी येथील राजकारणाचे चित्र बदलत आहे.सहकारातील अभ्यासू आणि जाणकार नेते म्हणुन जाचक यांची ओळख आहे.त्यामुळे अडचणीतील छत्रपती कारखान्याला पुर्ववैभव प्राप्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार नविन राजकीय खेळी करणार असल्याचे बोलले जाते.तसेच जाचक यांच्या पुढील भुमिकेवरच ‘छत्रपती’च्या बिनविरोध निवडणुकीची गणिते ठरणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!