राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी कृतज्ञता दिवस म्हणून तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आदरांजली अर्पण
उद्योग, कला,व्यापार, क्रीडा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली

राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी कृतज्ञता दिवस म्हणून तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आदरांजली अर्पण
उद्योग, कला,व्यापार, क्रीडा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली
बारामती वार्तापत्र
आपल्या महान कार्याने महाराष्ट्र आणि देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज शंभरावी पुण्यतिथी त्यानिमित्ताने स बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने शाहू महाराज यांचे प्रतिमेसमोर शंभर सेकंद उभे राहून शाहूराजांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली.
लोकाराजा छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ साली कागल याठिकाणी झाला तर मृत्यू ६ मे १९२२ रोजी मुंबई याठिकाणी झाला.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणप्रसार व जुन्या रूढी, परंपरा बंद करणे, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले. एवढेच नव्हे तर त्यांनी विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. बहुजन घटकांना आरक्षण देण्याबरोबरच प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध कठोर कायदा केला.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. शोषित समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली.
राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाहू महाराजांनी केवळ सामाजिक बदलाकडे लक्ष दिले नाही तर उद्योग, कला,व्यापार, क्रीडा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली. १९०६ साली महाराजांनी शाहू स्पिनींग अँड व्हॅविंग मिल ची स्थापना केली , १९१२ ला खासबाग हे कुस्तीचे मैदान बांधून कुस्ती खेळाला प्रोत्साहन दिले , शाहूपुरी ही गुळाची बाजार पेठ वसविली,सहकारी कायदा करून सहकारी चळवळीस प्रोत्साहन दिले. शेतीच्या पाण्याची सोय करण्यासाठी भोगावती नदीवर जगातील मातीचे पहिले धरण बांधले असा हा सर्वांगीण विकास साधणारा दूरदृष्टी असणारा राजा व आरक्षणाचे जनक होते असे मनोगत तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व्यक्त करून आदरांजली वाहिली.
शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, गटनेते सचिन सातव व ॲड.अरविंद गायकवाड यांनी देखील राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली व आदरांजली वाहिली.
यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर,गटनेते सचिनशेठ सातव बारामती नगरीचे मा. उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हा.चेअरमन दत्तात्रय सणस, मा.सभापती अनिल खलाटे, नगरसेवक सोनू काळे,पुणे जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष नितीन शेंडे,ॲड.अरविंद गायकवाड,पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष साधू बल्लाळ, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे, सचिव नितीन काकडे, बारामती तालुका राष्ट्रवादी युवती संघटनेच्या अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे, विजय गावडे,सुधाकर माने, हरूनबाबा,तालुका उपाध्यक्ष बाळासो आगवणे सर, संतोष साळुंके,राम गवळी, नाना भोसले, वैभव जगताप,आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.