राजू शेट्टींचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल.
दूध संघ राज्याच्या तिजोरीवर दरोडा मारत असल्याचा केला घणाघाती आरोप.
राजू शेट्टींचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल.
दूध संघ राज्याच्या तिजोरीवर दरोडा मारत असल्याचा केला घणाघाती आरोप.
बारामती वार्तापत्र
बारामतीमध्ये आज दि.27 ऑगस्ट रोजी शेतकरी संघटनेचे च्या वतीने राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बारामतीतील शारदा प्रांगणापासून प्रांत कार्यालयापर्यंत तीन गायींसह मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला.या वेळी बोलताना अनेक जण दूध उत्पादकांच्या नावाने दरोडेखोरी करीत आहेत.
उत्पादकांच्या हक्काचे पैसे लुटत असल्याने आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत असे यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच
दुधाला प्रतिलिटर ५ रू अनुदान त्वरीत देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करत दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर १७ ते २० रूपये दूध दर दिला जातो.यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत असे मत व्यक्त केले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यातील दूध व्यवसायावर संक्रात आलेली असून लॉकडाऊनमुळे हॉटेल,आईस्क्रिम, मॉल, विवाह सोहळे आदी बंद झाले आहेत. याचा विपरीत परिणाम दुधाच्या खपावर झालेला आहे. राज्यात दररोजचे दूध उत्पादन ११९ लाख लिटर आहे. ५२ लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. तसेच
दूध पावडरचा दर ३३० रूपयांवरून १८० रूपयावर आलेला आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाले आहे. देशात सध्या १.५ लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील ५० हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. तरीही केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत. तसेच बटरचा दर ३४० रूपयावरून २२० रूपये झाला आहे.याचा परिणाम दूध खरेदीवर झाला असून अनेक संस्था १७ ते २० रूपये लिटरने दुधाची खरेदी करत आहेत.यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यात पँकीग दुधात १९ लाख लिटरने घट झालेली आहे. सन २०१८ मध्ये आम्ही दूध आंदोलन केल्यानंतर शासनाने प्रति लिटर ५ रूपयेचे अनुदान जाहीर करून ७०० कोटी रूपयाचे अनुदान दूध उत्पादकांना दिले होते. याचा फायदा राज्यातील ४६ लाख दूध उत्पादकांना झाला होता.त्याप्रमाणे राज्य सरकारने प्रतिलिटर दुधास ५ रूपयांचे अनुदान द्यावे. तसेच केंद्र सरकारने ३० हजार टन दूध
पावडर बफर स्टॉक करावा. दूध पावडर करीता प्रतिकिलो ५० रूपये अनुदान देण्यात यावे. दूध पावडर, बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्यात यावी या सर्व मागण्यांकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २१ जुलै रोजी
संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसाचे दूध बंद आंदोलन करण्यात आले होते. तरी देखील माय बाप सरकारला जाग आलेली नाही. उत्पादन खर्चापेक्षा १० रूपये कमी दराने शेतकर्यांना दूध विकावे लागत आहे. दुधाला प्रतिलिटर ५ रूपये अनुदान देऊन २५ रूपये लिटरला भाव द्यावा,या मागणीसाठी आम्ही जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी जनावरांसहित आलो आहोत. आपणांस विनंती की, आमच्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवून शेतकर्यांच्या दुधाला प्रतिलिटर ५ रूपये अनुदान त्वरीत द्यावे,अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करु अशा आशयाचे पत्र देखील यावेळी राजू शेट्टी यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहे.