राज्यपालांना देण्यात आलेल्या 12 आमदारांच्या यादीत बदल , कुणाचा पत्ता कट?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाट्य, सांस्कृतिक या विभागातून हेमंत टकले यांचे नाव दिलं असल्याची माहिती समोर

राज्यपालांना देण्यात आलेल्या 12 आमदारांच्या यादीत बदल , कुणाचा पत्ता कट?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाट्य, सांस्कृतिक या विभागातून हेमंत टकले यांचे नाव दिलं असल्याची माहिती समोर
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा अद्यापही कायम आहे. आमदारांच्या नियुक्तीवर अद्याप राज्यपालांकडून शिक्कामोर्तब झालेले नाहीये त्यातच आता एक नवी माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे दिलेल्या 12 सदस्यांच्या यादीत बदल झाल्याचं वृत्त आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणखी एका नावाचा समावेश केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 12 सदस्यांच्या यादीत आणखी एका नावाचा समावेश केला आहे. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हेमंत टकले यांच्या नावाचा समावेश करण्यात आल्याचं वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वीच आपल्याकडून चार नावे दिली होती त्यानंतर आता आणखी एका नावाचा समावेश यादीत झाल्याने आता कुणाचा पत्ता कट होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाट्य, सांस्कृतिक या विभागातून हेमंत टकले यांचे नाव दिलं असल्याची माहिती समोर येत आहे. यादीत आणखी एका नावाचा समावेश झाल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकूण पाच नावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे आता राज्यपाल या सदस्यांची नियुक्ती करताना कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतं हे पहावं लागेल.
महाविकास आघाडी सरकारची राज्यपाल नियुक्त विधान परिषद 12 सदस्यांची यादी.
राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे – समाजसेवा आणि सहकार
राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा
यशपाल भिंगे – साहित्य
आनंद शिंदे – कला
काँग्रेस
रजनी पाटील – समाजसेवा आणि सहकार
सचिन सावंत – समाजसेवा आणि सहकार
मुझफ्फर हुसेन – समाजसेवा
अनिरुद्ध वनकर – कला
शिवसेना
उर्मिला मातोंडकर – कला
नितीन बानगुडे पाटील – शिवव्याख्याते
विजय करंजकर – शिवसेना नाशिक जिल्हाध्यक्ष
चंद्रकांत रघुवंशी – नंदुरबार, पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार