राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद, रोहित पवारांचं कडक ट्विट, उदयनराजेही संतापले

समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद, रोहित पवारांचं कडक ट्विट, उदयनराजेही संतापले

समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय?

प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ‘समर्थ रामदास’ यांच्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांना कुणी विचारलं असतं? असं वक्तव्य केलं. राज्यपालांच्या विधानावर आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद उफाळला आहे.

समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय? असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. औरंगाबादेत आयोजित समर्थ साहित्य परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

गुरू शिष्य परंपरेचं महत्त्व सांगताना त्यांनी हे वक्तव्य केलं. समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज नसते, असं ते म्हणाले. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं होतं.

वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद

खासदार उदयनराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यपालांवर टीका केली आहे. उदयनराजे यांनी आपल्या पोस्ट म्हटलं की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्याखऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकीचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

पुढे त्यांनी म्हटलं की, खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.

राज्यपालांनी माफी मागण्याची मागणी

राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करुन राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, ‘खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं’

राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती.

खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. #राज्यपाल_माफी_मागा’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

पुण्यात राष्टवादीचं आंदोलन
राष्ट्रवादीने पुणे महापालिकेत जोरदार आंदोलन केलं. राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची टीका राष्ट्रवादीने केलीय. राज्यपालांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीने केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram