राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आश्रमशाळेच्या धरणे आंदोलनास सदिच्छा भेट.
कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न व मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आश्रमशाळेच्या धरणे आंदोलनास सदिच्छा भेट.
कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न व मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
बारामती वार्तापत्र ,इंदापूर प्रतिनिधी
इंदापूर तहसील कचेरी समोर मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक,माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनिअर कॉलेज इंदापूरच्या वतीने विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन दि.५ सप्टेंबर २०२० रोजी म्हणजेच शिक्षकदिनी संस्थेचे अध्यक्ष तथा इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे, संस्थेचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांनी सुरू केले असून कार्यालयीन वेळेत सकाळी १०:३० ते सायं.५:३० वा.पर्यंत बेमुदत आंदोलनास आंदोलनकर्ते बसत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत पालन आंदोलन स्थळी करण्यात येत आहे.गत वर्षीचे अनुदान व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व निवेदनात दिल्याप्रमाणे मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.
दि.१० सप्टेंबर रोजी आंदोलन स्थळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम,मृद व जलसंधारण,सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सदिच्छा भेट दिली. आंदोलनकर्ते रत्नाकर मखरे व कर्मचाऱ्यांसमवेत चर्चा करताना म्हणाले की, मी व राज्य सरकार आपल्या पाठीशी असून आपल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे.त्यावर संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे यांनी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या शिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.असे शेवटी चर्चे दरम्यान सांगितले.