राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पिंपरी बुद्रुक येथे पुणे जिल्हा बँकेच्या शाखेचा स्थलांतर समारंभ होणार संपन्न
लासुर्णे शाखेच्या एटीएम सेंटरचे ही होणार उद्घाटन

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पिंपरी बुद्रुक येथे पुणे जिल्हा बँकेच्या शाखेचा स्थलांतर समारंभ होणार संपन्न
लासुर्णे शाखेच्या एटीएम सेंटरचे ही होणार उद्घाटन
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लासुर्णे शाखेच्या एटीएम सेंटरचे व इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील शाखेचे जुन्या इमारती मधून नवीन इमारतीमध्ये शनिवारी ११ सप्टेंबरला सकाळी साडे अकरा वाजता स्थलांतर करण्यात येणार आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, उपाध्यक्षा अर्चना घारे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, पिंपरी बुढृक गावच्या सरपंच ज्योती बोडके, सोसायटीचे अध्यक्ष सुदर्शन बोडके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.