इंदापूर
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक
पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक
पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
बारामती वार्तापत्र
राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे वडील विठोबा रामा भरणे (वय ९०) यांचे मंगळवारी (ता. २९ डिसेंबर) रात्री अकराच्या सुमारास दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासह चार मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ते तालुक्यात तात्या नावाने परिचित होते. प्रगतिशील शेतकरी अशी त्यांची ख्याती होती.तालुक्यातील सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे त्यांच्यावर बुधवारी (ता. ३० डिसेंबर) सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.