राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे पुन्हा खेळाच्या मैदानात
व्हॉलीबॉल मैदानात उतरून खेळण्याचा घेतला आनंद
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे पुन्हा खेळाच्या मैदानात
व्हॉलीबॉल मैदानात उतरून खेळण्याचा घेतला आनंद
इंदापूर : सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
भैरवनाथ स्पोर्ट क्लब काझड (शिंदेवाडी) कडून भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्पर्धेच्या उद्घाटनानंतर मैदानात उतरून व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेतला.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच राज्यमंत्र्यांनी इंदापूर येथे क्रिकेट स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थिती दर्शवत तुफान फटकेबाजी करत मैदान गाजवले होते. मात्र पुन्हा एकदा मैदानात उतरून खेळांविषयी आपली आवड त्यांनी दाखवून दिली आहे.
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे नेहमी चर्चेत असतात. कधी सूरपाट्या,कधी कबड्डी, कधी क्रिकेट, तर कधी व्हॉलीबॉल या खेळातून राज्यमंत्री मातीतील खेळाच मैदान गाजवत असल्याचे दिसून येत आहे.