राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात,अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
रळीतील निवासस्थानाखाली त्यांचं अपहरण केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी आरोप केला आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात,अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
रळीतील निवासस्थानाखाली त्यांचं अपहरण केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी आरोप केला आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. मात्र त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला आहे. अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांचं 10 जणांनी अपहरण केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला आहे. वरळीतील निवासस्थानाखाली त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी देशमुख कुटुंबियांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली.
मात्र मिळालेल्या माहितीनुसार गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. कोणत्या प्रकरणात त्यांना ताब्यात घेतलं याबाबत अधिकृत माहिती सीबीआयने अद्याप दिलेली नाही. गौरव चतुर्वेदी आणि आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.
अनिल देशमुख यांच्या सून राहत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव चतुर्वेदी वरळीतील घराखाली आले असताना त्यांना दहा जणांनी गाडीत बसवलं. दोन इनोव्हा कारमधून हे सर्वजण आले होते. यावेळी गौरव यांचा मोबाईल त्यांनी आधी ताब्यात घेतला. त्यांच्या गाडीतील काही कागदपत्रही ताब्यात घेतली आहेत.
कोणतीही कारवाई करण्यापूर्वी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही पूर्वसूचना मिळाली नसल्याची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली आहे. त्यामुळेच देशमुख कुटुबियांना पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.