राज्यातील मद्यालयांना रात्री दहापर्यंत परवानगी
करोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही वेळमर्यादा बदलण्याचे स्वातंत्र्य स्थानिक यंत्रणांना देण्यात आले आहे.
राज्यातील मद्यालयांना रात्री दहापर्यंत परवानगी
करोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही वेळमर्यादा बदलण्याचे स्वातंत्र्य स्थानिक यंत्रणांना देण्यात आले आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
राज्यातील सर्व मद्यालयांना (लीकर बार) सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत व्यवसाय करण्यास मुभा देण्याचा निर्णय पर्यटन विभागाने घेतला. त्याचवेळी करोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही वेळमर्यादा बदलण्याचे स्वातंत्र्य स्थानिक यंत्रणांना देण्यात आले आहे. सोमवारपासून हॉटेल, मद्याालयांना व्यवसाय करण्याची मुभा शासनाने दिली. त्यानुसार हॉटेल व्यवसाय सुरू झाला. मात्र वेळ मर्यादेबाबत शासन आदेश स्पष्ट नसल्याने मद्याालय चालक मालक संभ्रमात होते. काही महापालिकांनी मद्याालयांना संध्याकाळी सात, नऊ, दहा वाजेपर्यंत व्यवसाय किंवा मद्याविक्रीची परवानगी दिली. तर काही महापालिकांनी वेळ नमूद न करता नियमांप्रमाणे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी, असे ढोबळ आदेश काढल्याने संभ्रम निर्माण झाला.
नियमांप्रमाणे व्यवसाय म्हजणे मध्यरात्री एकपर्यंत व्यवसायास परवानगी, असा समज काही मद्याालय मालकांनी करून घेतला. तर उत्पादन शुल्क, पोलीस, पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मद्याविक्री केंद्रांना (वाईनशॉप) संध्याकाळी सातपर्यंत परवानगी असल्याने मद्याालयांनीही त्याच वेळमर्यादेत मद्याविक्री करावी, असा ग्रह करून घेतला. त्यामुळे संभ्रम आणखी वाढला. परिणामी सोमवारी मुंबई महानगर प्रदेशातील तुरळक मद्याालये सोमवारी खुली झाली. त्यापैकी काही मद्याालये संध्याकाळी सातनंतर बंद करावीत यावरून शासकीय यंत्रणा आणि मद्याालय चालकांमध्ये वादही झाले.
या पाश्र्वाभूमीवर पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वेळमर्यादेबाबत एकसूत्रता आणून संभ्रम दूर केल्याचे सांगितले. राज्यातील प्रत्येक शहर, जिल्ह्यांतील मद्याालये रात्री दहापर्यंत व्यवसाय करू शकतील. मात्र परिस्थितीनुसार ही वेळ मर्यादा बदलण्याचे स्वातंत्र्य स्थानिक यंत्रणांकडे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हॉटेल, मद्याालयांसाठी नियमावली निश्चिात करण्याची जबाबदारी पर्यटन विभागाकडे होती. त्यामुळे या विभागाने मंगळवारी घेतलेला निर्णय उत्पादन शुल्क विभागाने सर्व जिल्हा अक्षिक, भरारी पथक आणि अन्य विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांना कळवल्याचे समजते.
वेळ मर्यादेबाबत संभ्रम दूर झाला असला तरी रात्री दहापर्यंतच्या मुदतीबाबत मद्याालय चालक नाखूष आहेत. ग्राहकसंख्येबाबत बंधन घातल्यानंतर शासनाकडून नियमित वेळेनुसार (मध्यरात्री एकपर्यंत) व्यवसाय करण्याची परवानगी मिळेल, अशी अपेक्षा होती. पुढल्या टप्प्यावर टाळेबंदी सैल करताना शासनाने याबाबत विचार करावा, अशी प्रतिक्रिया आहार या मद्याालय चालक-मालकांच्या संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केली.