राज्यातील संपावर गेलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना सरकारनं 31 मार्चपर्यंतची डेडलाईन ,उपमुख्यमंत्री म्हणाले, ही शेवटची संधी, मग मात्र…
कामगारांना 10 तारखेपर्यंत पगार देण्याची जबाबादारीही सरकारने घेतली आहे.
राज्यातील संपावर गेलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना सरकारनं 31 मार्चपर्यंतची डेडलाईन ,उपमुख्यमंत्री म्हणाले, ही शेवटची संधी, मग मात्र…
कामगारांना 10 तारखेपर्यंत पगार देण्याची जबाबादारीही सरकारने घेतली आहे.
पुणे: प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपावर गेलेल्या एसटीच्या (ST) कर्मचाऱ्यांना शेवटची डेडलाईन दिली आहे. परीक्षा सुरू आहे. विद्यार्थ्यांना एसटीची गरज आहे. अनेक विद्यार्थी अडचणीच्या भागातून येतात. त्यांना दुसरं वाहन परवडत नाही, त्यामुळे एसटी कामगारांना विनंती आहे की त्यांनी कामावर परतावं. जे निलंबित झालेत, ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याची संधी दिली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेले सांस्कृतिक सभागृह, कॅन्टीन व गाड्यांचा लोकार्पण सोहळा आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘एसटीचा प्रश्न आता सुटलेला आहे. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल सभागृहात माहिती दिलेली आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून पगारवाढही केली गेली आहे.
वर्षाला सुमारे ७५० कोटींचा बोजा सरकारवर पडणार आहे. पगार वेळेत होणार आहेत. त्याची जबाबदारी राज्य सरकारनं घेतली आहे. त्यामुळं ३१ मार्चपर्यंत जर कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही तर त्यानंतर जे कामावर येणार नाहीत, त्यांच्याबाबत कठोर कारवाईची भूमिका घेतली जाईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
एसटीचा प्रश्न सुटलेला आहे. अनिल परब यांनी काल समजूतदारपणे भूमिका घेतली. एसटी कामगारांना त्यांनी शेवटची संधी दिली आहे. एसटी कामगारांना जवळपास सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास नेलं आहे. त्यांची पगारवाढ केली आहे. पूर्वी पेक्षा त्यात साडेसातशे कोटी रुपये वर्षाला वाढ झाली आहे. कामगारांना 10 तारखेपर्यंत पगार देण्याची जबाबादारीही सरकारने घेतली आहे. त्यामुळे कामगारांनी आता कामावर रूजू व्हावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.