राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार असून मुदत संपल्यावर प्रशासकाची नियुक्ती होणार!
सर्व निवडणूका आता घेतल्या जाणार नाहीत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार असून मुदत संपल्यावर प्रशासकाची नियुक्ती होणार!
सर्व निवडणूका आता घेतल्या जाणार नाहीत.
बारामती वार्तापत्र
राज्य निवडणूक आयोगाने याबाबत आज पत्रक काढले असून कोरोनाच्या संसर्गाची स्थिती लक्षात घेता नजिकच्या काळात निवडणूका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे ज्या नगरपालिकेच्या पाच वर्षाच्या मुदती संपणार आहेत, त्याठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, जेजुरीसह बहुतेक नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार होत्या.
या सर्व निवडणूका आता घेतल्या जाणार नाहीत. या सर्व ठिकाणी आता प्रशासकाची नियुक्ती होणार हे नक्की झाले आहे.
या निवडणुकांच्या तयारीत असणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचा आता हिरमोड होणार आहे.