मुंबई

राज्यात उन्हाच्या तीव्र झळा कायम,मध्य महाराष्ट्रासह कोकणात आज पावसाचा इशारा, तर पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस झाला आहे.

राज्यात उन्हाच्या तीव्र झळा कायम,मध्य महाराष्ट्रासह कोकणात आज पावसाचा इशारा, तर पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस झाला आहे.

मुंबई :प्रतिनिधी

राज्यात उन्हाच्या तीव्र झळा कायम आहेत. त्यामुळे जनता हैराण झाली आहे. तर दुसरीकडेर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस झाला आहे. त्यामुळे थोडासा येथे दिलासा मिळाला आहे. आजही पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात तापमान वाढ आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. उत्तरेकडील राज्यात अजूनही उष्णतेची तीव्र लाट आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात तापमान वाढ थांबण्याची चिन्हं नाहीत. मात्र दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्च्रात पावसाळी वातावरण आहे.

आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे.

दरम्यान, एप्रीलमध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा पारा 39 अंशापासून 46 अंशपर्यत जाईल असा अंदाज सांगण्यात आला आहे. राज्यात 11 एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण राहील  व वाऱ्याचा वेग वाढेल. राज्यात 38 अंश पासून 45 अंश पर्यंत उन्हाचा पारा वाढेल. 11 एप्रीलपर्यंत सांगली, पुणे, कराड उमरगा, देवणी, सोलापूर, आटपाडी, इस्लापूर, रत्नागिरी,  चिपळूण, वाई, सातारा या भागात चार दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, तर तुरळक ठिकाणी  पाउस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

विदर्भात सर्वत्र कमाल तापमान 41 अंशांच्या पुढे आहे. तर राज्यात अकोल्यात सर्वोच्च म्हणजे 43.9 अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातही पारा चाळीशी पार आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळं हातातोंडाशी आलेले गहू पीक क्षणात जमीनदोस्त झाले. तर आडसाली ऊस पीकही वादळाने खाली कोसळला आहे. पुन्हा राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी, शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram