राज्यात एसटी महामंडळाचे एकूण 86 हजार 568 कर्मचारी संपात सहभागी,2 मागण्यांसाठी सरकार सकारात्मक

हा संप एसटी मंहामंडळाकडून मोडून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जातोय.

राज्यात एसटी महामंडळाचे एकूण 86 हजार 568 कर्मचारी संपात सहभागी,2 मागण्यांसाठी सरकार सकारात्मक

हा संप एसटी मंहामंडळाकडून मोडून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जातोय.

प्रतिनिधी

राज्यात एसटी महामंडळाचे एकूण 86 हजार 568 कर्मचारी संपात सहभागी असल्याची आकडेवारी प्रथमच समोर आली आहे. हा संप एसटी महामंडळाकडून मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होतोय.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मुख्य मागणीसह इतर मागण्यांना घेऊन राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत हा संप सुरु आहे. या संपामुळे बसस्थानकावर बसेस अक्षरश: उभ्या असून प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.

एकूण 86 हजार 568 कर्मचारी संपात सहभागी

मागील अनेक दिवसांपासून या संपाची दाहकता किती असावी याचे अंदाज बांधले जात होते. मुंबईत आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी तळ ठोकलेला आहे. तर राज्यात कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. राज्यभर बसफेऱ्या थांबलेल्या आहेत. या पार्श्वभमूमीवर एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांची आकडेवारी प्रथमच जारी केलीय. या संपात एकूण 86 हजार 568 कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये 36 हजार 758 चालक तर 27 हजार 23 वाहक आहेत.

राज्यभरात एकूण 71 बस वेगवेगळ्या मार्गावर धावल्या

एसटी महामंडळाने ही आकडेवारी जारी केलीय. तसेच कर्मचारी आजपासून (13 ऑक्टोबर) कामावर रुजू होत असून पटलावर नाव नोंदवण्यास सुरुवात झाली आहे, असे सांगण्यात आले आहे. तसेच कालपेक्षा आज शिवनेरी आणि शिवशाही बसेसची संख्या वाढली आहे. राज्यभरात एकूण 71 बस वेगवेगळ्या मार्गावर धावल्या आहेत. दिवसभरात 1938 प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केलाय, असे महामंडळाने सांगितले आहे. तर दुसरीकडे महामंडळाकडून संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप होतोय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram