मुंबई

राज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना 16 हजार किट्सचं वाटप करणार, दोन दिवसात मदत पोहोचेल: शरद पवार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दौरा करणं गरजेचं पण इतर नेतांनी टाळावे

राज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना 16 हजार किट्सचं वाटप करणार, दोन दिवसात मदत पोहोचेल: शरद पवार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दौरा करणं गरजेचं पण इतर नेतांनी टाळावे

मुंबई:बारामती वार्तापत्र 

राज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना 16 हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. तसेच त्यांना औषधे आणि लहान मुलांसाठी बिस्किटेही पाठवली जाणार आहेत, असं. येत्या दोन ते तीन दिवसात ही मदत पुरवली जाणार आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या सर्व साहित्याची किंमत अडीच कोटी आहे, असंही त्यांनी सांगितलं. (NCP Chief Sharad Pawar addresses media over Maharashtra flood)

राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्याला पूराचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. सहा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं. शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं. माती वाहून गेली. मात्र, सहा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने मदत करण्याची गरज आहे. राज्य सरकारने काही मदत काल जाहीर केली, असं शरद पवार म्हणाले.

मास्कही वाटप करणार

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना मास्क दिलं जाईल. तसेच पुरामुळे आजारी पडलेल्यांवर औषधोपचार करण्यात येईल. 250 डॉक्टरांची टीम या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. तसेच या कुटुंबाला घरगुती भांडी देण्यात येतील. त्यात दोन पेले, दोन ताट, दोन वाट्या, तवा, आदींचा समावेश असेल. या संपूर्ण 16 हजार कुटुंबांना हे साहित्य देण्यात येईल. तसेच त्यांना अंथरुण पांघरूण देण्यात येणार आहे. सतरंजी आणि सोलापूरच्या दोन चादरीही देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. पूर नियंत्रणावर राज्य सरकार अंतिम धोरण लवकरच जाहीर करेल अशी आशा आहे. काही वर्षापूर्वी माळीण गावातही अशीच घटना घडली होती. त्याचं पुनर्वसन करण्यात आलं. पुनर्वसन कसं करतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे, असं ते म्हणाले.

राजकीय नेत्यांना आवाहन

पूरग्रस्त भागात राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. यावर शरद पवारांनी भाष्य करत म्हटलं, राजकीय नेते दौरे करतानाच गरजेचे पूर्तता करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दौरा करणं गरजेचं पण इतर नेतांनी टाळावे. अनेक लोक विनाकरण दौरा त्यामुळं शासकीय यंत्रणा लक्ष विचलित करतात त्यामुळे विनाकरण दौरा करू नये. आज राज्यपाल दौरा करत आहेत केंद्राकडून अधिक मदत मिळवून देतील असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

पूरग्रस्तांना राष्ट्रवादीचा मदतीचा हात

राष्ट्रवादीच्या वेल्फेअर मदत केली जात आहे. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप करणार आहोत. 2 लाख मास्कचं वाटप करणार, पूरग्रस्तांना अन्नधान्य, भांडी, पांघरूण, मास्क आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणार आणि येत्या दोन-तीन दिवसांत ही मदत पोहोचवली जाणार आहे. पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथक पाठवणार आहोत. केमिकल असोसिएशन वतीने औषध ही पूरग्रस्त भागात दिली जातील अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

शरद पवार – महाराष्ट्र 7-8 जिल्ह्यांत पूराचे संकट

अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं संकट

रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे आतोनात नुकसान

दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात माळीन घटना घडली होती तिथे पुनवर्सन कसं केले त्याच धर्तीवर मदत करावी

नवं गाव गावठाण उभे करणे आव्हान असते

संकटात उभारणी करणे गरजेच

16 हजार घर नुकसान आता माहिती मिळाली

रत्नागिरीत चिपळूण, खेड भागात पाच हजार घरांचे नुकसान

पूरग्रस्तांना राष्ट्रवादीचा मदतीचा हात

राष्ट्रवादीच्या वेल्फेअर मदत केली जात आहे

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटणार

2 लाख मास्कचं वाटप करणार

पूरग्रस्तांना अन्नधान्य, भांडी, पांघरूण, मास्क आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणार

येत्या दोन-तीन दिवसांत ही मदत पोहोचवली जाणार

पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथक पाठवणार

केमिकल असोसिएशन वतीने औषध ही पूरग्रस्त भागात दिली जातील

राजकीय नेते दौरे करतानाच गरजेचे पूर्तता करणे आवश्यक

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दौरा करणं गरजेचं पण इतर नेतांनी टाळावे

अनेक लोक विनाकरण दौरा त्यामुळं शासकीय यंत्रणा लक्ष विचलित करतात त्यामुळे विनाकरण दौरा करू नये

आज राज्यपाल दौरा करत आहेत केंद्राकडून अधिक मदत मिळवून देतील

राज्यात मदत धोरणावर पुन्हा विचार केला पाहिजे नवीन काही बदल केले पाहिजे

धोरणात नवीन काही बदल करणे गरजेचे

राज्य सरकार लवकरच मदतीची घोषणा करणार

पूरस्थितीचा अहवाल आल्यावर अंतिम मदतीची

अशा संकटांचा सामना करण्याचा महाराष्ट्राला अनुभव आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!