राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 105 नगरपंचायंतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
सध्या विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.
राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 105 नगरपंचायंतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
सध्या विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.
प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील जिल्हा बँक निवडणुकींची रणधुमाळी संपली. सध्या विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. हे सुरु असतानाचं राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 105 नगरपंचायंतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नंगरपंचायत निवडणुकीसोबत सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील होणार आहे.
ओबीसी आरक्षण अध्यादेशानंतरची पहिली निवडणूक
स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींचं आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द झाल्यानंतर राज्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता. ओबीसी संघटना आणि नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठराव विधानसभेत मंजूर होत असताना गोंधळ घातल्या प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. राज्य सरकारनं त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. मात्र, हायकोर्टानं याचिकेवरील सुनावणी सुरु असताना निवडणूक प्रक्रिया सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
आचार संहिता लागू
राज्यातील 32जिल्ह्यातील 105 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात 21 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल. तर, 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.
निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
अर्ज दाखल करणे: 1 ते 7 डिसेंबर
अर्जांची छाननी : 8 डिसेंबर
मतदान : 21 डिसेंबर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
निकाल : 22 डिसेंबर