राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकरणकर यांना कोरोनाचा संसर्ग,ट्विट करुन दिली माहिती
लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकरणकर यांना कोरोनाचा संसर्ग,ट्विट करुन दिली माहिती
लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन
पुणे –प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरयांना कोरोना ची लागण झालीय. स्वत: ट्विट करून त्यांनी ही माहिती दिलीय. सौम्य लक्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. तर संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. राज्यात कोरोनाचा फैलाव वाढला असून अनेक मंत्र्यांनाही संसर्ग झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे निर्बंध कठोर करण्याची शक्यताही राज्य सरकार पडताळून पाहत आहे.
ट्विट करुन दिली माहिती
राज्य महिला आयोगाच्या या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. ‘सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
या मंत्र्यांनाही झाली कोरोनाची दुसऱ्यांदा लागण
यापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील व त्यांची नवा विवाहित कन्या अंकिता पाटील – ठाकरे , काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीला कोरोनाची लागण झाल्ल्यामध्ये लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्या लोकांचा सर्वाधिक समावेश असल्याचे दिसून आले आहे