राज्य सरकारच्या विज बिल सक्तीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
भवानीनगर येथे आंदोलन करत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

राज्य सरकारच्या विज बिल सक्तीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
भवानीनगर येथे आंदोलन करत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
इंदापूर : प्रतिनिधी
कृषी वीज बील व घरगुती वीज बिलाच्या सक्तीने चालू असलेल्या वसुलीबाबत व विविध मागण्यांच्या संदर्भात आज (दि.१९) रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे सरकारचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.
कोणत्याही शेतकर-याची कृषी व घरगुती वीज सक्तीने तोडू नये, कोरोनाच्या काळातील घरगुती, व छोट्या व्यापारी वर्गाचे तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे.आजपर्यतचे कृषीपंपाचे वीजबिल हे पूर्णपणे माफ करावे, कृषिपंपाना ६ दिवस कमीत कमी १२ तास दिवसा वीजपुरवठा करावा, वीजबील वसुलीसाठी साखर कारखाने व ग्रामपंचायत या त्रयस्थ संस्थाना मध्यस्थ करू नये तसेच वीज अधिनियम २००३ नुसार ज्या शेतक-याच्या शेतामध्ये पोल व डी पी असल्यास प्रतिमाह २००० ते ५००० भरपाई भाडे मिळते ते मिळावे, वीज कायदा २००३ व लायसेंस रूल २००५ नुसार वरील सर्व अटी व शर्ती नुसार गांभीर्याने विचार करून मागण्या मान्य कराव्यात अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.
कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी आत्महत्या करत असताना, शेतमालाला कुठलाही हमीभाव नाही.शेतकऱ्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत हे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात निर्दय पद्धतीने वागत आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात गवताच्या काडीलाही हात लावण्याची कोणाची हिम्मत नव्हती आणि त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात हा बळीराजा संकटांत भरडला जात असताना. गरीब शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हा अन्याय शेतकरी संघटना कदापी सहन करणार नाही.त्याविरोधात आम्ही आवाज उठवणार मग यासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे पुढे पाहणार नाही. अशा शब्दात अमरसिंह कदम यांनी राज्य सरकारला खणखणीत इशारा दिला.यावेळी शेतकरी व पोलीस प्रशासन यांच्यातील वातावरण तणावपूर्ण होत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी आंदोलकांना आंदोलन शांतता मार्गाने करावे अशी विनंती केल्यानंतर वातावरण निवळले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हा सचिव राजेंद्र सपकळ, सतीश चव्हाण, रिंकू निंबाळकर, रवींद्र यादव, विष्णू कदम, विशाल काळे, शिवाजी रुपनवर,राजेंद्र कदम,शिवाजी रुपनवर,प्रशांत जाधव, सागर कदम, शिवाजी निंबाळकर, बापूराव सपकाळ, मोरे सर, नारायण मानकर, प्रवीण घोरपडे, विशाल निंबाळकर, बापू मानकर, जालिंदर कदम,रणजीत घाडगे,शैलेश काळे, शिवाजी सपकाळ, बाबू शिंदे,अँड. प्रशांत रुपनवर, अनिल पांढरे, सचिन मोरे, मधुकर कदम, भूषण बोराटे, सुनील बोराटे, विशाल निंबाळकर,तसेच सणसर, हिंगणेवाडी, सपकळवाडी, उद्धट, तावशी,जांब,निंबोडी, कुरवली या भागातील शेतकरी वर्ग उपस्थित होता.