राणा दाम्पत्याचा बाहेर पडण्याचा मार्ग कठीण? जामीन अर्जावर आज निर्णय नाहीच, सुनावणी उद्यावर
पोलिसांकडून जामिनाला कडाडून विरोध होणार
राणा दाम्पत्याचा बाहेर पडण्याचा मार्ग कठीण? जामीन अर्जावर आज निर्णय नाहीच, सुनावणी उद्यावर
पोलिसांकडून जामिनाला कडाडून विरोध होणार
मुंबई,प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इतर प्रकरणांमुळे आज सुनावणी घेणे शक्य नसल्याने उद्या (शनिवारी) सुनावणी घेण्याचं न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निश्चित केलं आहे.
व्यस्त कामकाजामुळे मुंबई सत्र न्यायालयाच्या वतीनं गेल्या सुनावतीच स्पष्ट करण्यात आलं होतं की, शक्य झाल्यासच आम्ही शुक्रवारी ही सुनावणी घेऊ. त्यानुसार, आज याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की, याचिकाकर्त्य दाम्पत्य निवडून आलेलं आमदार आणि खासदार आहेत. हे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आज थोडा वेळ का होईना न्यायालयाला शक्य असल्यास ते युक्तीवाद करण्यास तयार आहेत. परंतु, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत. न्यायालयाकडे आज जराही वेळ नाही, असं न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे.
आता राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. उद्या दुपारी 3 वाजता राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं, आज आम्ही या संपूर्ण प्रकरणावर लेखी म्हणणं मांडलं आहे.