राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम लक्षात घेता;लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणार्यांवर होणार कारवाई.
महाराष्ट्र पोलिसांकडून खबरदारी घेण्याच्या सूचना.
राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम लक्षात घेता;लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणार्यांवर होणार कारवाई.
महाराष्ट्र पोलिसांकडून खबरदारी घेण्याच्या सूचना.
बारामती वार्तापत्र
दि.५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्या येथे श्री राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम अयोध्या येथे असल्याने कोणत्याही प्रकारचे लोकांचेमध्ये संभ्रम निर्माण करतील अशा प्रकारचे मॅसेज टाकु नये.
सोशल मिडीयावर व्हायरल करू नये.
जेणेकरून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होवुन कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
आपण सर्व सुज्ञ नागरीक आहात आपण असे करणार नाहीत. अशी आपल्याकडुन आपेक्षा आहे. जर अशा स्वरूपाचे मॅसेज आपल्याकडुन सोशल मिडीया,एसएमएस, व्हाट्सअप, फेसबुक, व्टिटर, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही डिजीटल माध्यमांमध्ये दोन समाजात जातीय तेढ,धार्मिक
तेढ निर्माण होईल असे कोणतेही प्रक्षोमक आणि आक्षेपार्ह संदेश साहीत्य,चित्रफित इत्यादी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समुह प्रसारीत करणार नाही.
तसेच जातीय वैमनस्य,धार्मिक तेढ,समाजात तिरस्कार निर्माण करणाऱ्या कोणत्याही स्वरूपाच्या अनधिकृत खोटया बातम्या कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समुह प्रसारीत करणार नाही.
अशा स्वरूपाचे मेसेज आपल्याकडुन सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यास व्हायरल करणाऱ्या व त्या गुप अँडमिनला मी कलम ६८ नुसार प्रतिबंध करीत आहे. असे कृत्य केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय दंड संहिता कायदयानुसार त्यांचेवर गुन्हे दाखल होतील.
अशा अशा आशयाचे पत्र उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी काढले असून ग्रुप ॲडमिन ने आत्ताच आपल्या गुपमधील सर्व सदस्यांना सुचना दयाव्यात. तसेच सेंटिगमध्ये जावुन फक्त गुप अँडमिन मेसेच सेंड करील असे सेंटिंग करावे. अशा सूचना केल्या आहेत.