रायगड परिसरात बारामती ट्रेकर्स क्लब च्या वतीने मदत.
चक्रीवादळ मुळे झालेल्या नुकसानी साठी मदतीचे आव्हान.
रायगड परिसरात बारामती ट्रेकर्स क्लब च्या वतीने मदत.
चक्रीवादळ मुळे झालेल्या नुकसानी साठी मदतीचे आव्हान
बारामती:वार्तापत्र निसर्ग चक्री वादळा मुळे रायगड व परिसरात मोठे नुकसान झाले त्यामुळे बारामती ट्रेकर्स क्लब च्या वतीने थेतील नागरिकांना मदत देण्यात आली व उर्वरित मदती साठी मदतीचे आव्हान करण्यात आले.
ऍड सचिन वाघ , अमोल काटे , सुधीर पानसरे , योगेश वाघ , ऋतुराज काळकुटे , विकास बाबर , राहुल झाडे , प्रशांत राजपुरे , प्रदीप ताटे ,संदीप बांदल आदींनी मदत केली व उपस्तीत होते . मदतीच्या आव्हान ला
प्रतिसाद देत समाजातील सर्व स्थरातून 10 रु पासून 10000 पर्यंत मदत दिली तर काही व्यक्तींनी वस्तू स्वरूपात मदत केली त्यात 200 नवीन साड्या
100 रेन कोट घर झाकण्यासाठी चांगल्या दर्जाच्या 24 ताडपत्र्या शाळेतील मुलांना 130 चपल्स , निदान 8 दिवस पुरतील बिस्किट , टोष्ट , फरसाना शालेय साहित्य , दफतर , वह्या ,पेन ,पेन्सिल 10 पोती गहू आदी वस्तू देण्यात आल्या.
सदर मदत पोहचवताना “रायगड वासीयांचा स्वाभिमान जपला , त्याना झालेला आनंद दिसत होता तिथल्या एका भगिनी ने आमचे भाऊ आम्हाला मदत घेऊन आलेत अशी भावना व्यक्त केली
आणखीन कोणास मदत करावयाची असल्यास त्यांनी बारामती ट्रेकर्स क्लब ला संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे .