बारामतीतील नगरसेवकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; महिलेविरोधात गुन्हा दाखल
पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक पालवे करीत आहेत.

बारामतीतील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर व नगरसेवक असलेल्या राजेंद्र बनकर यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी महिलेविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला स्टेट बँकेत नोकरी करीत आहेत. दि १३ मार्च २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान व जुलै २०२१ मध्ये या महिलेने फिर्यादी बनकर यांना कॉन्ट्रॅक्टच्या कामाकरिता कर्ज प्रकरण मंजूर करून देण्यासाठी व त्यांच्या दोन भाच्यांना बँकेत नोकरी लावून देण्यासाठी म्हणून बनकर यांच्याकडून वेळोवेळी ९,७६,५००/- रु. घेतले. परंतु त्या महिलेने कर्ज प्रकरण मंजूर केले नाही व त्यांच्या भाच्यांना नोकरीलाही लावले नाही. त्यामुळे बनकर यांनी त्यांना दिलेली रक्कम परत मागितली असता ती त्यांना परत न देता त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बनकर यांची आर्थिक फसवणूक केली आहे.
पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक पालवे करीत आहेत.
पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक पालवे करीत आहेत.