राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ; यांना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच नाही, वृत्त निराधार
स्वत: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी याबाबतची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात होतं

मुंबई: बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी यूपीएमध्ये हालचाली सुरू असल्याचं वृत्त होतं. स्वत: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी याबाबतची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. हे वृत्त निराधार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवार यांच्या हवाल्याने ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे. प्रशांत किशोर यांनी माझ्याशी माझ्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा केल्याचं वृत्त निराधार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी काय गणित मांडलंय हे मला माहीत नाही. प्रशांत किशोर यांनी माझी भेट घेतली. मात्र, ही राजकीय भेट नव्हती. 2024च्या निवडणुकीवर या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
.