बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचा २१ वा वर्धापन दिन बारामती येथील
राष्ट्रवादी भवनामध्ये अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शारीरिक
अंतर राखत पार पडला. वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीकडून शहर,
तालुक्यात रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
बुधवारी (दि. १०) येथील पक्ष कार्यालयात तालुकाध्यक्ष संभाजी
होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, उपसभापती प्रदीप धापटे, गटनेते सचिन सातव, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड, बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे, खरेदी-विक्री संघाचे शिवाजीराव टेंगले,तालुका युवक अध्यक्ष राहुल वाबळे, सोशल मीडियाचे प्रमुख सुनील बनसोडे आदी उपस्थित होते.