राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वतीने डॉ.आंबेडकर नगर व अण्णाभाऊ साठे नगर येथे मोफत वाफेचे यंत्र.
कोरोनाला आळा घालण्याकरिता शहरात राबविण्यात येत आहे उपक्रम.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वतीने डॉ.आंबेडकर नगर व अण्णाभाऊ साठे नगर येथे मोफत वाफेचे यंत्र.
कोरोनाला आळा घालण्याकरिता शहरात राबविण्यात येत आहे उपक्रम.
बारामती वार्तापत्र, इंदापूर:-प्रतिनिधी
दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येमुळे शहरात तसेच तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनावर प्रचंड ताण आहे.
परंतु ‘आम्ही इंदापूरकर’ ही भावना मनात ठेऊन कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी स्वखर्चाने इंदापूर शहरात अनेक ठिकाणी वाफेचे यंत्र बसवून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पाऊल टाकले आहे.
तसेच हा उपक्रम संपूर्ण शहरासह तालुक्यात सर्वत्र राबविण्यात येणार असल्याचे बारामती वार्तापत्रशी बोलताना नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी सांगितले.
या उपक्रमाअंतर्गत सामाजिक भावनेतून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांचे वतीने इंदापूर शहरातील डाॅ. आंबेडकरनगर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर येथे मोफत वाफेचे यंत्र माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांचे हस्ते बसविण्यात आले.
यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा.अशोक मखरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब अडसुळ, राजू मखरे, चंद्रकांत सोनवणे, संदिपान मखरे, अमोल मखरे, दत्तात्रय शिंदे, सोनु ढावरे, विकास साबळे, उमेश ढावरे, अनार्य मखरे, नितीन ढावरे, बोधिसत्व मखरे, सचिन ढावरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे व नगरसेविका राजश्री मखरे यांनी उपस्थितांना वाफेचे महत्व पटवून दिले.